महाबळेश्वर, सातारा- महाबळेश्वर तालुक्यामध्ये कोयना धरणाच्या वाळणे गावातील जलाशयामध्ये दोन शाळकरी अल्पवयीन मुलींचा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली, चार मुली या जलाशयामध्ये पोहण्यासाठी गेल्या होत्या यातील २ मुलींचा मृत्यू झाला, तिसऱ्या मुलीवर प्राथमिक उपचार केंद्रामध्ये उपचार सुरु आहेत तर चौथी मुलगी सुखरूप असल्याचे समजत आहे.
सदर घटनेची फिर्याद हि वाळणे गावातील आशासेवीका शुभांगी सुनील तांबे (वय-४३) रा. वाळणे, ता.महाबळेश्वर, जि. सातारा यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दिली आहे, या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले कि रविवारी सकाळी शुभांगी तांबे यांच्या घरी मुलगी हर्षदा सुनील तांबे हिच्यासोबत गावातील आणखी चार मैत्रिणी नवे पुढीलप्रमाणे आर्य दिवाक नलावडे (वय-१२), सृष्टी सुनील नलावडे (वय-१३), सोनाक्षी रामचंद्र सुतार (वय-१३) रा. वाळणे, ता. महाबळेश्वर तर सोनाक्षी तानाजी कदम (वय-१२) रा. वेंगळे, ता. महाबळेश्वर या अभ्यास करण्यासाठी आल्या होत्या. या सर्वजण अभ्यास करीत असताना दु. १२.३० च्या दरम्यान मुलींचा आवाज येत नसल्याने तांबे या पाहण्यासाठी घराबाहेर आल्या त्यावेळी घराजवळील कोयना धरणाच्या दिशेने मुलींचा आरडाओरडा सुरु असल्याचा आवाज ऐकू येऊ लागला, यावेळी तांबे त्या आवाजाच्या दिशेने धरणाकडे गेल्या असता घरी अभ्यास करणेसाठी आलेल्या चारही मुली या पाण्यात बुडत असलेच्या त्यांच्या निदर्शनात आले, तांबे यांनी धरणामध्ये उडी मारून आर्य नलावडे, सृष्टी नलावडे, सोनाक्षी सुतार या मुलींना बुडत असताना पाण्यातून बाहेर काढले. या परिसरातील लोकांनी आरडाओरड केल्याने धरणात मच्छिमार करीत असलेल्या लोकांनी बोटीने येऊन सोनाक्षी कदम हिला पायातून बाहेर काढले. मात्र या घटनेमध्ये सोनाक्षी कदम व सोनाक्षी सुतार या दोन्ही मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. सृष्टी सुनील नलावडे या मुलीवर प्राथमिक आरोग्य केंद्र तापोळा येथे उपचार करून पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय महाबळेश्वर येथे दाखल करण्यात आले तर आर्य नळावले या मुलीची तब्येत ठीक असल्याने तिला प्राथमिक उपचार देऊन घरी सोडण्यात आले. मृत पावलेल्या सोनाक्षी कदम व सोनाक्षी सुतार या मुलींचे मृतदेह शवविच्छेदन करून रात्री उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या सदर घटनेची फिर्याद वाळणे गावातील आशासेवीका शुभांगी सुनील तांबे रा. वाळणे, ता. महाबळेश्वर, जि. सातारा यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. सदर दुःखद घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली आहे. या घटनेची संपूर्ण चौकशी व तपास महाबळेश्वर पोलीस ठाण्यातील अधिकारी करीत आहेत.