कोळे गावच्या पेय जल नळ या योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचे येथील ग्रामस्थांचे मत असून २०२२ पासून घरटी ५००० रुपये डिपॉझिट घेऊन सुद्धा गेल्या दोन वर्षांपासून या योजनेचे काम अद्यापही पूर्ण नाही त्यामुळे या योजनेची सखोल चौकशीची मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत. या गावातील ग्रामस्थ श्री. निवास बबन मोरे यांनी माहितीचा अधिकार या अंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये या संपूर्ण योजनेची माहिती मिळावी यासाठी दि. ८ जानेवारी २०२४ रोजी अर्ज दिला होता परंतु २ महिने उलटूनही अद्याप माहिती पुरविली गेली नाही व वारंवार पाठपुरावा करूनही टाळाटाळ केले जात असल्याचा आरोप निवास मोरे यांनी केला आहे.