श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आंचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी आज दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त सातारा जिल्ह्यामध्ये दारू विक्रीस बंदी ड्राय डे असल्याने अशी विक्री करणारे इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिल्या होत्या त्याप्रमाणे कारवाई करण्याकरिता अरुण देवकर पोलीस निरीक्षक यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या अधिपत्याखाली एक विशेष पथक तयार करून त्यांना कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.
दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक पुणे शाखा सातारा यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की विंग ता. कराड जि. सातारा येथील हॉटेल रॉयल लँडस्केप या ठिकाणी चोरीटी दारूची विक्री चालू आहे. अशी माहिती मिळाल्याने त्यांनी सहपुरुष निरीक्षक व त्यांच्या अधिपत्याखालील पथकास सदर ठिकाणी जाऊन छापा कारवाई करून कारवाई करण्याच्या आदेश दिले त्याप्रमाणे सह पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व त्यांच्या पथकाने आज दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी शिंदेवाडी विंग ता. कराड जि. सातारा येथील हॉटेल रॉयल लँडस्केप या ठिकाणी दुपारी छापा टाकून राज्य उत्पादन शुल्क पथक कराड यांच्या सह कारवाई केली असून सदर ठिकाणी हॉटेल मालकाच्या सांगण्याप्रमाणे तिन्ही सामान्य जिल्हाधिकारी सो, सातारा यांचे दारू विक्री बंदी आदेशाचा भंग करून विदेशी दारूची विक्री करीत असताना मिळून आले असून त्यांचा कब्जात विदेशी दारू रॉयल स्टॅग, रोमानो वोडका, व्हाईट मिसचिफ, डी.एस.पी ब्लॅक, डॉ. ब्र्यांडी, ब्लेंडर प्राईड, मॅकडोवेल न.१ अशा वेगवेगळ्या कंपनीचा 13 लाख 11 हजार 204 रुपये विदेशी दारूचा माल व रोख रक्कम 12,630 रुपये असा एकूण 13 लाख 23 हजार 834 चा माल मिळून आला असून सदर इसमांवर कराड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आंचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली सादर कारवाई मध्ये अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा सातारा, सह पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक सचिन भिलारी, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक तानाजी माने सह फौजदार सुधीर बनकर, पोलीस हवालदार साबीर मुल्ला, अतीश घाडगे, विजय कांबळे, संजय शिर्के, मंगेश महाडिक, सनी आवटे, शिवाजी भिसे, प्रवीण कांबळे, मोहन नाचन, सचिन साळुंखे, राजू कांबळे, मनोज जाधव, लक्ष्मण जगधने, अरुण पाटील, प्रवीण पवार, मोहसीन मोमीन, मयूर देशमुख, कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार सचिन जगताप, नितीन येळवी, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षक श्रीमती डॉ. उमा पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक नितीन जाधव, जवान विनोद बनसोडे, महिला जवानी रानी काळोखे यांनी सहभाग घेतला.