
जळगाव,(प्रतिनिधी) – जळगावातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये BVG कंपनीमार्फत कार्यरत असलेल्या कामगारांना गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. थकित पगारामुळे कामगार आर्थिक संकटात सापडले असून त्यांच्या घरखर्च, कर्जफेड आणि शिक्षणावर गंडांतर आले आहे.या अन्यायकारक परिस्थितीविरोधात आज (३० ऑगस्ट २०२५) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. “BVG कंपनीने तात्काळ थकित पगार दिले नाहीत, तर शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन होईल आणि कंपनीला काळ फासण्यात येईल.” असा इशारा भाऊसाहेब सोनवणे यांनी दिला आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार खालील कामगारांचे वेतन थकित आहे
निलेश धनगर
सुनिता सोनवणे
कल्पेश सोनवणे
प्रशांत वाघोडे
कामगारांचे म्हणणे आहे की, “काम प्रामाणिकपणे करूनही पगार न मिळणे हा आमच्यावर अन्याय आहे. आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह संकटात आला आहे. प्रशासनाने हस्तक्षेप करून थकित पगार मिळवून द्यावेत.”या प्रसंगी शिवसेना जिल्हा परिषद गटप्रमुख प्रभाकर कोळी, शाखाप्रमुख भोकर लोटनभाऊ सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.शिवसेनेचे स्पष्ट मत आहे की कामगारांचे वेतन रोखणे म्हणजे कामगार कायद्याचा भंग आणि थेट आर्थिक शोषण आहे. त्यामुळे प्रशासनाने BVG कंपनीविरुद्ध कठोर कारवाई करून कामगारांना न्याय द्यावा.